संमेलनच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
 

  गिरीमित्र संमेलन

  महाराष्ट्र सेवा संघ


   गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो. चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणेही तितकेच गरजेचे होते. पूर्वी असे काही प्रयत्न झाले होते, पण त्यांना म्हणावे तसे यश आले नव्हते.

Read more


   सन १९३७, विजयादशमीच्या मुहूर्तावर मुलुंडमधील काही होतकरू हौशी तरुण मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक सांस्कृतिक कार्याचे एक छोटेसे रोपटे लावले. धार्मिक उत्सव साजरे करणे, प्रत्येकाच्या अन्य कार्यातील अडचणी दूर करणे व सर्वांनी एकत्र व्हावे असे अगदी साधे सोपे उद्दिष्ट या संस्थेच्या स्थापनेत होते. जसजसे कार्यकर्ते जमत गेले तसतशी अनेक नवनवीन उपक्रमांची यामध्ये भर पडत गेली आणि आज या रोपट्याचे महाकाय अशा वटवृक्षात रुपांतर झाले. आज महाराष्ट्र सेवा संघ हि सांस्कृतिक, सामाजिक व कला क्षेत्रातील आघाडीची संस्था म्हणून ओळखली जाते. भव्य व सुसज्ज असे ग्रंथालय, साहित्य, नाटक व संगीत विषयक कार्यक्रमांची रेलचेल, विज्ञानविषयक कार्यक्रम, गिरीमित्र संमेलन, व्याख्यानमाला, आरोग्य शिबिरे आणि अर्थविषयक कार्यक्रम असे असंख्य उपक्रम आज महाराष्ट्र सेवा संघातर्फे मोठ्या उत्साहात यशस्वीपणे राबविले जात आहेत.

Read more


Copyright गिरीमित्र संमेलन, सर्व हक्क सुरक्षित.