गिरिमित्र संमेलन २०१८

१४ व १५ जुलै, २०१८
शनिवार आणि रविवार

महाराष्ट्र सेवा संघ
पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०.

दूरध्वनी: +९१-२२-२५६८१६३१

 संमेलनस्थळ नकाशा


 गिरीमित्र संमेलन २०१७ स्मरणिका

डोंगरभटक्यांचे हक्काचं व्यासपीठ असणारा उपक्रम म्हणजे 'गिरिमित्र संमेलन'. २००१ पासून महाराष्ट्र सेवा संघाने सुरु केलेला हा उपक्रम आज डोंगरभटक्यांमध्ये सर्वात लोकप्रिय असा आहे. कदाचित जगाच्या पाठीवरदेखील अशाप्रकारे एकाच ठिकाणी इतके डोंगरभटके एकत्र येत नसावेत. भारतातीलच नाही तर अनेक विदेशी गिर्यारोहकांनी येथे हजेरी लावली आहे. वेगवेगळी सादरीकरणे, गिर्यारोहणावरील माहितीपट, चित्रपट, परिसंवाद, प्रश्नमंजुषा, छायाचित्र आणि फिल्म स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम येथे सादर केला जातो. दरवर्षी जुलैच्या दुस-या आठवड्यात मुलुंड येथे होणा-या या समारंभाची वाट सर्वच डोंगरभटके आतुरतेने पाहत असतात.

  बातम्या

गिर्यारोहण विषयक दृकश्राव्य सादरीकरण स्पर्धा, ट्रेकर ब्लॉगर स्पर्धा, अभ्यासपूर्ण सादरीकरण असे उपक्रम दरवर्षीप्रमाणे घेतले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी गिरीमित्र स्पर्धा या वेबपेजला कृपया भेट द्यावी.


गिरिमित्र संमेलन २०१७ काही क्षणचित्रे  (सर्व छायाचित्रे पाहण्यासाठी येथे भेट द्या.)

 • Photo 1

  संमेलन प्रमुख श्री. मुकेश मैसेरी यांचे प्रास्ताविक

 • Photo 2

  गेरलिन्ड कल्टेनब्रुनर यांची मुलाखत घेताना श्री. हरिष कपाडिया

 • Photo 3

  गेरलिन्ड कल्टेनब्रुनर यांचे दृक्श्राव्य सादरीकरण

 • Photo 4

  गिरीमित्र संमेलन श्रोते

 • Photo 5

  गिरीमित्र संमेलन श्रोते

 • Photo 6

  गिरीमित्र संमेलन कार्यकर्ते


गिरिमित्र संमेलन २०१७ प्रमुख अतिथी गेरलिन्ड कल्टेनब्रुनर

गेरलिन्ड कल्टेनब्रुनर यांना लहानपणीच त्यांच्या गावाजवळील डोंगर रांगांमध्ये भटकण्याचे वेड लागले व वयाच्या १३ व्या वर्षीच स्ट्रुटझान शिखरावर चढाई केली. नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या गेरलिन्ड यांनी काही वर्षांनंतर मग व्यावसायिक गिर्यारोहक बनायचे ठरवले.

सन १९९८ मधे त्यांनी पहिले ८००० मीटर वरील "चो ओयु" शिखर सर केले. मग त्या नंतर, कालांतराने नंगा परबत, ल्होत्से, कांचनगंगा, एवरेस्ट इत्यादी शिखरे सर करत, सन २०११ मधे "के-२" शिखर सर केले व त्या जगातल्या आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या सर्वच्या सर्व १४ हिमशिखरांवर यशस्वी आरोहण करणा-या दुस-या महिला ठरल्या.

विशेष म्हणजे त्यांनी या सर्व हिमशिखरांवर कृत्रिम प्राणवायू आणि अतिउंचावर साधनसामग्री वाहून नेणा-या पोर्टर व शेर्पांच्या मदतीशिवाय आरोहण केले आहे. अशा प्रकारे आरोहण करणा-या त्या पहिल्याच महिला गिर्यारोहक आहेत.

अधिक माहिती गेरलिन्ड यांच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.  गिरिमित्र सन्मान

गिर्यारोहकांचा गिर्यारोहकांनी कृतज्ञेपोटी केलेला सन्मान" हे शब्द आहेत श्री शरद ओवळेकर यांचे. म्हणूनच गिर्यारोहकांचा केला जाणारा हा गौरव "गिरिमित्र सन्मान" म्हणून ओळखला जातो.

अधिक माहिती

  गिरिमित्र स्पर्धा

दर वर्षी संमेलनात विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात (छायाचित्रण, दृक्श्राव्य इत्यादी). त्या संदर्भातील माहिती, प्रवेश अर्ज व अर्जाची अंतिम तारीख वगैरे माहिती.

अधिक माहिती

  मिडिया गॅलरी

संमेलनाविषयी वृत्तपत्रामध्ये, सोशल मिडिया वरच्या बातम्या, व्हिडीओ, ब्लॉगवरील नोंदी व इतर माहिती यांचा खजिना.


अधिक माहिती