मध्यवर्ती संकल्पना


२००२ मध्ये गिरिमित्र संमेलनाला सुरुवात झाली. डोंगरभटक्यांनी एका व्यासपीठावर यावे हा यामागचा हेतु. पण केवळ एकत्र येणे इतपतच तो मर्यादीत राहीला नाही. सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये याचे स्वरुप विविध सादरीकरणे, व्याख्याने असे होते. तिसऱ्या संमेलनापासून ‘मध्यवर्ती संकल्पना’ हा मुद्दा विशेषत्वाने विचारात घेण्यात आला. त्यानुसार मग मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरुन व्याख्याने, चर्चासत्र, सादरीकरणे सुरु झाली. पण त्याचे स्वरुप केवळ आमंत्रितांना बोलावून दिवस साजरा करणे इतपत न राहता, काही मध्यवर्ती संकल्पनेस अनुसरुन दस्तावेजीकरण झाले.

चौथ्या संमेनलनासाठी ‘महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाची ५० वर्षे’ ही संकल्पना निवडण्यात आली. ६० च्या दशकात महाराष्ट्रात गिर्यारोहणाचे बीज रुजले तेव्हापासूनच्या अनेक महत्वाच्या घडामोडी, सुळके, हिमशिखरांवरील पहिली आरोहणे अशा अनेक महत्वाच्या घटनांचे दृक् श्राव्य दस्तावेजीकरण यामुळे केले गेले. गिर्यारोहकांची सामजिक बांधिलकी, संस्थात्मक गिर्यारोहणाची वाटचाल, महिला आणि गिर्यारोहण अशा अनेक घटकांचा यामध्ये आढावा घेतला गेला. दरवर्षी मध्यवर्ती संकल्पना असली तर प्रत्येकवेळी तो विषय दस्तावेजीकरणाचा असत नाही. त्याची मांडणी अन्य माध्यमातून केली जाते.

गेल्या १८ वर्षांमध्ये यातील काही महत्वाची सादरीकरणांचे लेखन या निमित्ताने आपणासमोर ठेवत आहे.