इनिस पेपर्ट – जागतिक कीर्तीची गिर्यारोहक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
इनेस पापर्ट ही गिर्यारोहणातली एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे – तिचं जीवन हे धैर्य, समतोल आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे.
जगप्रसिद्ध जर्मन गिर्यारोहक इनिस पेपर्ट हे आइस, मिक्स्ड, रॉक आणि अल्पाइन चढाई क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणून ओळखले जाते . तिने चार वेळा आइस क्लायंबिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून स्पर्धात्मक पर्वतारोहणात आपली श्रेष्ठता सिद्ध केली. तिने २० हून अधिक वर्ल्ड कप आइस-क्लाइंबिंग स्पर्धा जिंकल्या आहेत.
नैसर्गिकरित्या पुरुषांची शारीरिक क्षमता जास्त असते पण २००५साली इनिस ने महिलांची अंतिम फेरी तर जिंकलीच पण पुरुषांसाठी लावलेल्या अंतिम फेरीतील चढाई मार्गांवर तिने पुरुषांना देखील मागे टाकले आणि ओरे आईस क्लाइंबिंग फेस्टिवल मध्ये पुरुषांना हरवून एकूण विजेती पदक मिळवलं. ती केवळ स्पर्धात्मक यशापुरती मर्यादित राहिली नाही, तर जगभर अनेक प्रथम आरोहण (first ascents) करून पर्वतारोहणात नवे मापदंड निर्माण केले.
तिच्या धाडसी, नैसर्गिक आणि नैतिक आरोहणशैलीमुळे ती जगभरातील गिर्यारोहकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
मूळतः फिजिओथेरपिस्ट असलेल्या इनिसने १९९०च्या दशकात गिर्यारोहणाला सुरुवात केली. बर्हचटेसगाडेन येथे राहायला गेल्यावर तिला पर्वतांमध्ये चढाईची ओढ लागली.
१९९३ पासून तिने सातत्याने चढाई सुरू केली आणि लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं. २००६ नंतर स्पर्धात्मक क्लाइंबिंग सोडून संपूर्ण लक्ष उच्च पर्वतीय मोहिमांवर केंद्रित केलं.
२००३ मध्ये नॉर्थ फेस, “सिम्फोनी डी लिबर्टे” (त्यावेळच्या भिंतीवरील सर्वात कठीण मार्ग) आणि आयस्कलेटररूटेन (मिश्र) ते डिग्री (एम ११) पर्यंतचे पहिले आरोहण.
२००७ मध्ये जगातील आतापर्यंतच्या सर्वात कठीण मिश्र मार्गाची दोनदा चढाई लॉ अँड ऑर्डर मार्ग (एम १३).
२०१३ मध्ये नेपाळमधील लिखू चुली I (६७१९ मी) शिखरावर एकट्याने चढाई.
२०१५ मध्ये स्कॉटलंडमधील सर्वात कठीण पारंपरिक मिश्र मार्ग The Hurting (XI/11) चढाई करणारी पहिली महिला.
२०१६ मध्ये किर्गिझस्तानमध्ये “Lost in China” (Kyzyl Asker) या नवीन मार्गाची पहिली चढाई.
२०१६ मध्ये “Scaramouche” 8a+ जर्मनीतील तांत्रिक दृष्ट्या अत्यंत कठीण मार्गाची दोनदा चढाई.
इनिस ही केवळ गिर्यारोहक नाही, तर “Vertical” हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे व जगभर प्रेरणादायी व्याख्यानं देणारी वक्ता आहे. विशेषतः रॉक आणि आयुष्य यातील समतोल साधून स्वतःची ध्येये कशी साध्य करायची याबाबत ती बोलते.
इनिसने सुप्रसिद्ध स्लोव्हेनियन गिर्यारोहक लुका लिंडिक यांच्याशी विवाह केला आणि ती एका मुलाची आई आहे.
पर्वतारोहणाशिवाय तिला पॅराग्लायडिंग, छायाचित्रण आणि निसर्गपूरक जीवनशैली आवडते. नव्या पिढीच्या गिर्यारोहकांसाठी एक प्रेरणास्थान असलेल्या इनिसने केवळ शारीरिक क्षमतेचं नव्हे, तर मानसिक ताकदीचंही उत्तम उदाहरण ठेवले आहे. पर्वतरांगांमध्ये नैतिक आणि स्वच्छ आरोहणशैलीचा पुरस्कार केला आहे आणि पर्यावरणपूरक मोहिमांसाठी सक्रिय भूमिका घेतली आहे.