ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा
ब्लॉग स्पर्धा – नियम व सूचना
ब्लॉग विषय: पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्ग, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयीन भ्रमंती, पर्वतारोहण, हिमालयीन मोहिमा, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी, माउंटन सायकलिंग, गडसंवर्धन, गिर्यारोहणातील सुरक्षा.
भाषा: मराठी
स्पर्धेसाठी लिखाणाचा ग्राह्य कालावधी: ६ जून २०२३ ते १५ जून २०२४ या कालावधीतील लिखाण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
अंतिम मुदत: १५ जून २०२४ ( या तारखेनंतरच्या ब्लॉगवरील पोस्ट स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत ).
निकष: विषय मांडणी, भाषा, ताजेपणा, लिखाणातील तांत्रिक अचूकता, लिखाणातील सातत्य, ब्लॉग मांडणी.
कृपया नोंद घ्यावी:
ब्लॉगवरील सर्व लिखाण हे ब्लॉग लेखकाचे स्वत:चेच असणे आवश्यक आहे. लेखन स्वामित्व हक्काबाबत काही वाद असतील तर ते स्पर्धेत दाखल होण्यापूर्वीच जाहीर करणे बंधनकारक आहे. अशा स्वरूपातील लिखाणाचा समावेश स्पर्धेसाठी नाकारण्याचा पूर्ण हक्क आयोजक व परीक्षकांना असेल.
लेखन स्वामित्व हक्क संदर्भात काही वाद उत्पन्न झाल्यास त्यास गिरिमित्र संमेलन जबाबदार राहणार नाही.
- ब्लॉगवरील छायाचित्रे ही जर ब्लॉग लेखकाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची असतील तर तसे छायाचित्र सौजन्य नमूद करणे अपेक्षित आहे. असे न करण्याने जर सदर छायाचित्रकाराने त्यावर आक्षेप घेतला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ब्लॉग लेखकाची असेल. गिरिमित्र संमेलन यासाठी जबाबदार राहणार नाही.
- ब्लॉगवरील लिखाण कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, समाजाच्या अथवा व्यक्तिगत भावना दुखाविण्याचा प्रयत्न केलेले नसावे. अशा स्वरूपातील लिखाणाचा समावेश स्पर्धेसाठी नाकारण्याचा पूर्ण हक्क आयोजक व परीक्षकांना असेल.
- एखाद्या ब्लॉगवर जर स्पर्धेच्या विषयांव्यतिरिक्त अन्य विषयांवर पोस्ट असतील तर स्पर्धेच्या विषया संबधित पोस्ट एकत्रित करून त्याची लिंक द्यावी. जेणेकरून परीक्षकांना सोयीस्कर होऊ शकेल. यासाठी खालील टूल्सचा आधार घ्यावा.
- स्पर्धेत दाखल झालेल्या ब्लॉगवरील लिखाणाचे पुनःप्रकाशन संमेलन स्मरणिका, संमेलन वेबसाईट इ. माध्यमातून करण्याची मुभा गिरिमित्र संमेलनास असेल.
- परीक्षकांचे निकाल हे अंतिम व बंधनकारक असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क:
शंकर कदम – ८८९८३ २४५३३
संपदा कळमकर – ९५६१४ ८२२३७
Google Form Link: https://forms.gle/fck6fdKzX1sBHNdP7