
विषय: भटकंतीदरम्यान टिपलेले निसर्गरम्य दृश्य!
भटकंती, प्रवास आणि सह्याद्रीत अनुभवलेले सुंदर क्षण आपल्या मोबाईलमधून जगासमोर आणा!
छायाचित्र पाठविण्याची अंतिम तारीख: २० जून २०२६
१) ही स्पर्धा सर्व छायाचित्रण प्रेमींसाठी खुली आहे.
२) कृपया आपल्या छायाचित्रांनी निर्धारित विषयाच्या निकषांची पूर्तता होत असल्याची खात्री करा. फक्त प्रवास / भटकंतीदरम्यान काढलेली छायाचित्रेच स्वीकारली जातील. क्लोज-अप, फुले, प्राणी, पक्षी, कीटक किंवा मॅक्रो फोटोग्राफी स्वरूपातील छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत.
३) स्पर्धेसाठी सादर केलेले छायाचित्र मोबाईल फोनद्वारे काढलेले असणे आवश्यक आहे.
४) सर्व छायाचित्रांना क्रमांक दिलेले असावेत. संबंधित क्रमांकासमोर प्रवेश फॉर्ममध्ये छायाचित्राचे शीर्षक / कॅप्शन नमूद करावे. कृपया छायाचित्रांवर थेट कोणतेही कॅप्शन लिहू किंवा सुपरइम्पोज करू नये.
५) एकदा अपलोड केलेले छायाचित्र स्पर्धेतील प्रवेश म्हणून ग्राह्य धरले जाईल आणि ते दुसऱ्या छायाचित्राने बदलता येणार नाही.
६) ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, क्रॉपिंग आणि कलर करेक्शन यांसारखे मूलभूत संपादन मान्य असेल. अत्यधिक संपादन, AI-निर्मित घटक किंवा कॉम्पोझिट छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत.
७) प्रत्येक सहभागी जास्तीत जास्त ५ छायाचित्रे सादर करू शकतो.
८) स्पर्धेसाठी पाठवलेली सर्व छायाचित्रे सहभागीची स्वतःची मूळ निर्मिती असावीत.
९) छायाचित्रांवर कोणताही वॉटरमार्क, लोगो, नाव किंवा स्वाक्षरी नसावी.
१०) छायाचित्रे JPEG फॉरमॅटमध्ये आणि उच्च रिझोल्यूशनमध्ये सादर करावीत.
११) सादर केलेल्या छायाचित्रांशी संबंधित कॉपीराइट, परवानग्या आणि संमती यांची संपूर्ण जबाबदारी सहभागीची राहील.
१२) कॉपी केलेले, साहित्यचौर्य केलेले किंवा कॉपीराइटचे उल्लंघन करणारे छायाचित्र आढळल्यास संबंधित सहभागी अपात्र ठरविण्यात येईल.
१३) गिरिमित्र संमेलनास प्राप्त झालेली कोणतीही किंवा सर्व छायाचित्रे कॅटलॉग छपाई, प्रसारमाध्यम प्रसिद्धी, संकेतस्थळ व सोशल मीडिया प्रसिद्धी इत्यादी उपक्रमांसाठी पुनर्मुद्रित / वापरण्याचा अधिकार राहील.
१४) परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व सहभागींसाठी बंधनकारक असेल.
१५) अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेल्या नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत.
१६) आक्षेपार्ह, अश्लील किंवा बेकायदेशीर मजकूर असलेली छायाचित्रे तात्काळ बाद करण्यात येतील.
१७) स्पर्धेसाठी पाठवलेली छायाचित्रे कोणाच्याही कॉपीराइट, ट्रेडमार्क, कराराधिकार, बौद्धिक संपदा अधिकार किंवा गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी नसावीत. अशा कोणत्याही वादासाठी सहभागी स्वतः जबाबदार राहील.
१८) स्पर्धेत सहभाग नोंदविणे म्हणजे सहभागीने वरील सर्व नियम व अटी मान्य केल्याचे समजले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:
संजीव वेंगुर्लेकर – ९८६९१७४६०५
गणेश काळे – ९८१९०२६३०५
Google Form Link: https://forms.gle/8ivoohoJ72YdRgQy9